30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय तांदूळ, गहू, डाळीच्या हमीभावात वाढ

तांदूळ, गहू, डाळीच्या हमीभावात वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात अनेक क्षेत्रांची पिछेहाट झालेली असताना कृषि क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारले. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतक-यांना आणि शेतीसाठी काय तरतूद करणार याकडे लक्ष होते. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचे सरकार शेतक-यांना समर्पित असल्याचे सांगत हमीभावाबद्दल भाष्य केले. कोरोना संकटातही आशादायी वृद्धीझेप घेणा-या कृषिक्षेत्राच्या वाढीस आणखी चालना देण्याबद्दल आशावाद व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार कृषि क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आमचे सरकार शेतक-यांना समर्पित आहे. शेतक-यांचें उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत ३ टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतक-यांच्या खात्यात जमा केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील शेतक-याला मोदी सरकारकडून मदत दिली गेली. तांदूळ, गहू, डाळीसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. शेतमालाची खरेदी आणखी वाढवण्यात आली आहे आणि शेतक-यांना लाभ दिला जात आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी कृषि कर्जाचे उद्दिष्ट १६.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच १ हजार कृषि बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. याशिवाय कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४० हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. तसेच सूक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे. स्वामित्व योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. ऑपरेशन ग्रीन स्कीम योजनेची सीतारामन यांनी घोषणा केली. यात अनेक पिकांचा समावेश करण्यात येईल आणि शेतक-यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल.

हमीभावात बदल
हमीभावामध्ये मोठा बदल झाला आहे. २०१२ मध्ये शेतक-यांना हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये देण्यात आले होते. २०१५ मध्ये शेतक-यांना ५२ हजार कोटी रुपये दिले गेले. फक्त गव्हाचे उत्पादन घेणा-या ४३ लाख शेतक-यांना २०२०-२१ मध्ये ७५ हजार कोटी रुपये हमीभावापोटी देण्यात आले, असे सीतारामन यांनी सांगितले.

देशात ५ फिशिंग हब उभारणार
मासेमारी विकसित करण्यासाठी देशात ५ फिशिंग हब उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली.

-ऑपरेशन ग्रीन योजनेची घोषणा
-कृषि कर्जाचे उद्दिष्ट १६.६ लाख कोटी
-१ हजार कृषि बाजार ई-नामशी जोडणार
-पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची तरतूद
-सूक्ष्म सिंचनासाठी दुप्पट निधी
-स्वामित्त्व योजना देशभरात लागू

एलआयसी, आयडीबीआयसह विविध कंपन्यांचे खाजगीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या