नवी दिल्ली : सध्या चालू असलेला महिना अर्थात मार्च ते पुढील मे महिन्यादरम्यान देशभरात कडक उन्हाळा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. लोकांना केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीदेखील उष्णतेपासून सुटका मिळणार नाही, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे.
ज्या भागात उष्ण हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यात महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगड यांचा समावेश आहे. याशिवाय गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, ओडिशा, कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा समुद्र किनाºयाचा भाग याठिकाणी तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. सरत्या फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले होते. वर्ष २००६ नंतर पहिल्यांदाच यंदाचा फेब्रुवारी महिना कडक राहिला होता.
थंडीच्या दिवसात प्रशांत महासागरात ला नीनाचा प्रभाव जास्त होता. यामुळे यंदा थंडी खूप पडली होती. मात्र आता ला नीनाचा प्रभाव कमी होत आहे. याचमुळे तापमान वेगाने वाढत आहे. ला नीनाचा प्रभाव जर कायम राहीला असता तर थंड हवा कायम राहिली असती. ला नीनाचा प्रभाव ओसरल्यामुळे पुढील तीन महिन्यांत कडक उन्हाळ्याचा सामना लोकांना करावा लागू शकतो
लोकसभा-राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण