32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयभारत-बांगलादेश रेल्वेसेवा ५५ वर्षांनी पुन्हा सुरू होणार

भारत-बांगलादेश रेल्वेसेवा ५५ वर्षांनी पुन्हा सुरू होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश या दोन सख्या शेजारी देशांसाठी १७ डिसेंबर हा दिवस मोठा महत्वाचा असणार आहे. या दिवशी दोन्ही देशांमधील रेल्वे सेवा तब्बल ५५ वर्षांनी सुरु होणार आहे. या रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील हल्दीबाडी आणि बांगलादेशमधील चिलहटी यांच्या दरम्यान ही रेल्वे सेवा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे बांगलादेश पूर्व पाकिस्तानचा भाग होता तेंव्हा १९६५ सालापर्यंत या मार्गावर रेल्वे सेवा सुरु होती. त्यानंतर भारत आणि पूर्व पाकिस्तानमधील रेल्वे संपर्क तुटला होता. तो संपर्क आता बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

हल्दीबाडी रेल्वे स्टेशनपासून आंतरराष्ट्रीय सीमा साडे चार किलोमीटर अंतरावर आहे. तर बांगलादेशमधील चिलहटीपासून आंतरराष्ट्रीय सीमा ही साधारण साडे सात किलोमीटर दूर आहे. ही दोन्ही स्टेशन यापूर्वी सिलिगुडी आणि कोलकाता या जुन्या ब्रॉड गेज रेल्वेच्या मार्गावर होती. जो सध्याच्या बांगलादेशमधून जातो.

मालगाडी सुध्दा चालविण्यात येणार
ईशान्य भारत सीमा रेल्वे विभाग (एनएफआर)चे जनसंपर्क अधिकारी सुभाष चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. चिलहटी ते हल्दीबाडीपर्यंत एक माल गाडी चालवण्यात येणार असून, त्याची मालकी एनएफआरच्या कटिहार विभागाची आहे. कटिहार विभागातील रेल्वे अधिकाºयांनी देखील याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे.

पाच तासांची होणार बचत
भारत-बांगलादेश या दोन देशांमधून सुरु होणाºया या रेल्वे मार्गामुळे कोलकाता आणि जलपैगूडी या रेल्वेला आता सात तासांचा वेळ लागणार आहे. यापूर्वी या प्रवासाला बारा तास लागत असत. आता या रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांच्या वेळेत पाच तासांची बचत होणार आहे.

आगीशी खेळू नका – भाजपचा बॅनर्जी यांना सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या