22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयभारताची तांदूळ निर्यातीवर बंदी

भारताची तांदूळ निर्यातीवर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार भारताने गेल्या आठवड्यात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्याचा परिणाम जगभरात, विशेषत:: आशियाई बाजारपेठेत दिसून येत आहे. चार दिवसांत आशियाई बाजारात तांदळाच्या किमती ४ ते ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतीय व्यापारी नवीन करारांवर स्वाक्षरी करीत नसल्याने आशियातील तांदूळ व्यापार जवळजवळ ठप्प झाला आहे.

परिणामी खरेदीदार व्हिएतनाम, थायलंड आणि म्यानमारमध्ये पर्याय शोधत आहेत. मात्र, या देशांतील व्यापा-यांनी संधी साधून भाव वाढवले ​​आहेत. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे स्थानिक बाजारपेठेतील तांदळाच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत भाताची लागवड कमी होऊन उशीरही झाला आहे. भारत जगातील १५० हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो.

भारताच्या निर्णयानंतर आशियातील तांदळाच्या किमती पाच टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. भाव आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आशियातील तांदळाचा व्यापार ठप्प झाला आहे. व्यापा-यांना घाईत आश्वास द्यायची नाही. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. त्यामुळे येणा-या काळात किमती किती वाढतील याची कोणालाच खात्री नाही, असे भारतातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार सत्यम बालाजीचे संचालक हिमांशू अग्रवाल म्हणाले.

दहा लाख टन तांदूळ शिल्लक
तांदूळ हे जगातील तीन अब्ज लोकांचे मुख्य अन्न आहे. २००७ मध्येही भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर त्याची किंमत एक हजार डॉलर प्रति टन इतकी विक्रमी पातळीवर गेली होती. भारत सरकारच्या निर्णयानंतर देशातील प्रमुख बंदरांवर जहाजांमध्ये तांदूळ भरण्याचे काम थांबले आहे. सुमारे दहा लाख टन तांदूळ तेथे पडून आहे. सरकारने लादलेला नवीन २० टक्के कर भरण्यास खरेदीदार नकार देत आहेत.

निर्यातबंदीचा फायदा इतरांना
भारताचे प्रतिस्पर्धी देश थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमारमधील व्यापारी भारतातून तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचा फायदा घेत आहेत. तांदळाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खरेदीदार या देशांकडे वळत आहेत. मात्र, या देशांतील व्यापा-यांनी तांदळाच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. चार दिवसांत दर सुमारे दीड हजार रुपयांनी वाढले आहे असे डीलर्सचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या