27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताकडून स्विस बँकेतील १३ वर्षांचा विक्रम मोडित

भारताकडून स्विस बँकेतील १३ वर्षांचा विक्रम मोडित

एकमत ऑनलाईन

झ्यूरीक : स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम २० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँक स्विस नॅशनल बँकने (एसएनबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांचा २.५५ अब्ज स्विस फ्रँक (२०,७०० कोटींपेक्षा जास्त रुपये) जमा आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की खासगी बँकांच्या खात्यात जमा झालेल्या पैशात घट झाली आहे. त्याचबरोबर सिक्युरिटीज, कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून पूर्वीपेक्षा जास्त पैसे जमा केले गेले आहेत.

एसएनबीच्या आकडेवारीनुसार, २०१९ अखेरपर्यंत भारतीयांच्या ठेवींचा आकडा ८९९ दशलक्ष स्विस फ्रँक (६,६२५ कोटी रुपये) होता. २०१९ ची आकडेवारी दोन वर्षांच्या निचांकावरून उचांकाकडे जाऊन १३ वर्षांत बँकांमध्ये भारतीय ठेवींनी विक्रम मोडित काढला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार २००६ मध्ये भारतीय ठेवींनी ६.५ अब्ज स्विस फ्रँकची विक्रमी नोंद गाठली होती, परंतु त्यानंतर २०११, १३ आणि २०१७ वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नव्हता. परंतु २०२० ठेवींचे सर्व आकडे मागे टाकले. सन २०२० मध्ये, जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे ४००० हजार कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत ३१०० कोटी रुपये जमा झाले.

६०० अब्ज स्विस फ्रँकसह ब्रिटन आघाडीवर
एकूणच स्विस बँकांमध्ये वेगवेगळ्या देशांतील ग्राहकांच्या ठेवी २०२० मध्ये वाढून सुमारे २००० अब्ज स्विस फ्रँकपर्यंत पोहोचल्या आहेत. यापैकी ६०० अब्ज स्विस फ्रँक ही परदेशी ग्राहकांकडील ठेवी आहेत. या यादीमध्ये ब्रिटन आघाडीवर आहे. तेथील नागरिकांकडे स्विस बँकांमध्ये ३७७ अब्ज स्विस फ्रँक आहेत. त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक आहे (१५२ अब्ज स्विस फ्रँक).

भारत ५१ व्या क्रमांकावर
स्विस बँकेच्या ठेवींच्या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये वेस्ट इंडिज, फ्रान्स, हाँगकाँग, जर्मनी, सिंगापूर, लक्झेंबर्ग, केमन बेटे आणि बहामास यांचा समावेश आहे. या यादीत भारत ५१ व्या क्रमांकावर आहे आणि न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, हंगेरी, मॉरिशस, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांपेक्षा पुढे आहे. ब्रिक्स देशांपैकी भारत चीन आणि रशियाच्या खाली आहे तर दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या पुढे आहे.

साबरमती नदीतील सर्व नमुने कोरोनाबाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या