नवी दिल्ली : ब्रह्मोस एरोस्पेस हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनविण्यास भारत-रशिया संरक्षण संयुक्त उपक्रम सक्षम असून, भारतात पाच ते सहा वर्षांमध्ये असे पहिले क्षेपणास्त्र असेल, अशी माहिती ब्रह्मोस एरोस्पेसचे सीईओ आणि एमडी अतुल राणे यांनी दिली आहे.
ब्रह्मोसच्या दरम्यान, रौप्य महोत्सवी उत्सवादरम्यान संस्थेने अनेक प्रमुख कार्यक्रम, संमेलने आणि राष्ट्रीय-स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले आहे. याअंतर्गत जगातील सर्वोत्कृष्ट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीचे संचालन करणा-या भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाची आणि व्यावसायिकतेबाबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.