18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयभारतात सर्वांत कमी मृत्युदर

भारतात सर्वांत कमी मृत्युदर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात प्रति १० लाख लोकसंख्येच्या मागे कोविड-१९ मुळे होण्या-या मृत्यूंची संख्या ८१ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताचे नाव जगातील सर्वांत कमी मृत्युदर असणा-या देशांच्या यादीत नमूद झाले आहे. भारतात ४ ऑक्टोबरपासून रोज कोविड-१९ संसर्गामुळे १००० हून कमी रुग्णांचा मृत्यू होत आहे, तर शुक्रवारी मृत्युदर १.५२ टक्के इतका नोंदला गेला. हा दर २२ मार्चपासून आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे.

दरम्यान, २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेच बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात ७०,३३८ रुग्ण बरे झाले, तर २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या ६३,३७१ इतकी आहे. देशभराच आतापर्यंत ६४ लाख ५३ हजार ७७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्याच्या पुढे
मुंबई : कोरोनाचा संसर्ग ब-यापैकी नियंत्रणात आला असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८५ टक्क्यांपुढे गेले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ११ हजार ४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत राज्यात १५ लाख ७६ हजार ६२ कोरोनाबधित रुग्ण आढळून आले असून यातील १३ लाख ४४ हजार ३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आज ३०६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४१ हजार ५०२ झाली आहे. राज्यात एकूण १ लाख ८९ हजार ७१५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भंडारवाडीत मासे पकडण्यावरुन एकाचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या