23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयभारत एज्युटेकची मोठी बाजारपेठ

भारत एज्युटेकची मोठी बाजारपेठ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीने शिक्षण क्षेत्राला तारले. त्यामुळे भारतात एज्युटेक प्रणालीला खूप मागणी आली. त्यामुळे जगभरात भारतदेखील मोठे मार्केट बनले. हैदराबाद येथील एका शाळेत तर रोबोटच मुलांना शिकवते. बदलत्या परिस्थितीत एज्युकेटमध्ये भारत एक मोठी बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे आगामी काळात एज्युटेकला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

शिक्षणातील तंत्रज्ञानाला एज्युटेक म्हटले जाते. कोविडमुळे शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला होता. शिक्षणात खंड पडला होता. मात्र, कोविडनंतर एज्युटेक शिक्षणाचा अचानक वेग वाढला. कोविड काळात सुरू झालेली एज्युटेक प्रणाली आता जगभरात एज्युटेक इंडस्ट्री म्हणून ओळखली जाऊ लागली. नवोन्मेषाला चालना देणा-या या एज्युटेक उद्योगाचे संपूर्ण लक्ष आता जनरेशन झेडवर आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए वर्ल्ड फॅक्ट बुकनुसार १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या मुलांना जनरेशन झेड म्हटले जाते. इंटरनेटच्या या वेगवान दुनियेत या पिढीची मुलेही खूप वेगवान झाली आहेत. कारण त्यांचा जन्म प्रगत स्मार्टफोन्स आणि इंटरनेटच्या युगात झाला होता. १९९५ पासून जगात तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. साहजिकच त्यांच्या हातात स्मार्टफोन आणि हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शनदरम्यान जन्मलेली बाळे अधिक प्रगत असतील, यात शंका नाही. त्यामुळे एज्युटेकच्या दृष्टीने भारत मोठी बाजारपेठ असल्याचे मत आहे.

काही ठिकाणी रोबो टीचर, ईगल मॅम नुकतेच हैदराबादमधील एका शाळेत लॉंच करण्यात आले. इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या मुलांना शिकवणारी ईगल मॅम ३० भाषांमध्ये बोलू शकते. इतकेच नाही तर ही मॅम इतर शिक्षकांनाही मुलांना कसे शिकवायचे याचे ज्ञान देते. ईगल मॅम प्रश्नांची उत्तरे देऊन आणि मुलांचे प्रश्न विचारून त्वरीत शंका दूर करते.

ईगल मॅम क्लास संपल्याबरोबर ऑटोमेटेड असेसमेंट करतात. म्हणजेच मुलाला हा विषय किती समजला, त्याला काय आठवले आणि त्याचे उत्तर कितपत बरोबर होते. या सर्व गोष्टी ज्या मुलाच्या कार्यक्षमतेवर प्रतिब्ािंबित होतात. मुले आणि पालक मोबाईल आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांद्वारे रोबोट शिक्षकांचे मूल्यांकन आणि सामग्रीशी कनेक्ट होऊ शकतात. एवढे जग पुढे गेले आहे. त्यामुळे भविष्यात ही काळाची गरज बनू शकते.

अमेरिकेत रोबोट शिक्षिका
जिल वॉटसन अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच जॉर्जिया टेकमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आली आहे. ही शिक्षिका मानवरूपात दिसत असली तरी ती रोबोट शिक्षिका आहे. वास्तविक, जॉर्जिया टेक शिकवण्यासाठी आभासी शिक्षण सहाय्यक वापरत आहे. या व्हर्च्युअल असिस्टंटला जिल वॉटसन असे नाव देण्यात आले आहे.

जगातील टॉप एज्युटेक कंपन्या

कंपनी उत्पन्न
बायजूज : १० हजार कोटी
ब्लॅकबोर्ड : ५,६०० कोटी
अपग्रेड : १,९०० कोटी
करसर : ९६० कोटी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या