22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभारत एकच, राहुल गांधींनी पाकमध्ये 'भारत जोडो यात्रा' करावी

भारत एकच, राहुल गांधींनी पाकमध्ये ‘भारत जोडो यात्रा’ करावी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’वर जोरदार हल्लाबोल केला. सरमा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ही यात्रा पाकिस्तानात करावी. कारण, भारत एकसंध आहे, तो कधीही तुटलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
काँग्रेसचे माजी नेते आणि आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की १९४७ मध्ये काँग्रेस अंतर्गत भारताची फाळणी झाली होती. आता काँग्रेसने भारत जोडो यात्रेसाठी पाकिस्तानात जावे. राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात नेली पाहिजे. कारण, संपूर्ण भारत एकसंध आहे. आजपासून काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरू होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज (बुधवार) दक्षिणेतील कन्याकुमारी येथून या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तिथून हा प्रवास सुरू होऊन काश्मीरपर्यंत जाईल. ही एक पदयात्रा असेल, जी देशभरातून जाणार आहे. या यात्रेची काँग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. राहुल गांधी आज या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

काँग्रेसची पाच महिने चालणार पदयात्रा
या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचे एकूण अंतर सुमारे ३५०० किलोमीटर असेल. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू होईल आणि तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडे जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या