राजम : इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी रविवारी कार्यक्रमात म्हणले की, भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते आणि प्रदूषण. तर सिंगापूर म्हणजे स्वच्छ रस्ते आणि प्रदूषणमुक्त वातावरण असा होतो.
विझियानगरम जिल्ह्यातील राजम येथे जीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या समारंभात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना, नारायण मूर्ती म्हणाले की, एखाद्याने कोणत्याही संकटाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एन.आर नारायण मूर्ती यांनी संस्थेच्या एका प्रेस रिलीझमध्ये म्हणाले की भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि काही वेळा वीज नाही. मात्र, सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण आणि पुरेशा विजेची उपलब्धता आहे.