33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयचीनविरोधात भारत अधिक सतर्क

चीनविरोधात भारत अधिक सतर्क

पँगाँग सरोवरक्षेत्रात मरीन कमांडो तैनात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पूर्व लडाखमध्ये आपली सज्जता आणखी वाढविली आहे. पँगाँग सरोवरक्षेत्रात भारताने मरीन कमांडो तैनात केले आहेत, अशी माहिती लष्कराकडून देण्यात येत आहे. मरीन कमांडोंमुळे सध्या तैनात असलेल्या पथकांना अधिक मदत मिळणार आहे.

पुर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषवर जवळपास सहा महिन्यांपासून भारत व चीनदरम्यान तणाव कायम आहे. लष्करी पातळ्यांवर चर्चेच्या अनेक फेºयांनंतरही चीन आपला हेकेखोरपणा सोडत नसल्याने युद्धसदृश्य परिस्थिती कायम आहे. अशातच चीनकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याने भारतानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपली पकड थोडीशीही ढिली न करण्याचा इरादा कायम ठेवला आहे. भारताने आधीपासूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गरुड सैन्य संचलन आणि भारतीय सेनेच्या पॅरा स्पेशल दलांना सर्वप्रकारे सज्ज करुन ठेवले आहे. अशातच आता त्यांना मदत करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये मरीन कमांडो तैनात केले आहेत. मरीन कमांडोंच्या तैनातीमुळे भारताची स्थिती सीमेवर मजबूत होणार आहे. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाचे कमांडो आता लवकरच सरोवरात गस्त घालण्यासाठी नावा आणणार आहेत.

मोठा फौजफाटा तैनात
भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस पूर्व लडाखमध्ये दीर्घ कालापासून विशेष मोहिमा राबवत आहेत. भारतीय हवाई दलाचे गरुड विशेष दल तणावाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणत्याही लढाऊ किंवा अन्य विमानांची देखभाल करण्यासाठी आपल्या संरक्षण प्रणालीसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रणनीतिक उंचीवर पहाडांच्या शिखरावर पोहोचले आहे.

६ महिन्यांपासून विशेष तुकड्या तैनात
भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाशी संबंधित विशेष तुकड्या सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून तैनात आहेत. २९-३० आॅगस्टला भारताने याच विशेष दलांचा उपयोग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबरोबरच रणनीतिकदृट्या उंचींवरील जागांवर कब्जा करण्यासाठी केला होता. चीनला रोखणे हा या मागील उद्देश होता. चीननेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आपल्याकडील भागात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहे.

मरीन कमांडोजची कार्यपद्धती
मरीन कमांडोज फोर्सला संशिप्त रुपात ‘मार्काेस’ असे म्हटले जाते. विशेष कामगिरी पार पडण्यसाठी त्यांना प्रशिक्षित केलेले असते. हवा,पाणी व जमिनीवरील कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थिती व कामगिरीसाठी त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. जम्मु-काश्मीरमधील झेलम नदी व वुलर सरोवर परिसरात अतिरेक्यांविरोधात मार्काेसने अनेक यशस्वी कामगिरी करत अतिरेक्यांच्या योजना अयशस्वी केल्या आहेत. गनिमी काव्यासारख्या अचानक छापा मारुन करावयाच्या युद्धात ते वाकबगार असतात. तिन्ही सैन्यदलांच्या विशेष अधिकाºयांच्या संघातून निर्माण झालेल्या ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल आॅपरेशन्स डिव्हिजन’ अंतर्गत त्या कार्य करीत आहेत. १९८७ मध्ये एलटीटीईच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यात आॅपरेशन पवन अंतर्गत यशस्वी कामगिरी केली होती.

पोस्ट खात्यात ५०० रुपये ठेवणे बंधनकारक

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या