22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभारताला कमकुवत पंतप्रधानांची गरज

भारताला कमकुवत पंतप्रधानांची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाला पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर कमकुवत पंतप्रधानाची तसेच बहुपक्षीय सरकारची गरज आहे असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले असून यातूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली आहे.

यावेळी ओवैसी यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारवरही टीका केली आहे. आपचे सरकारही गुजरातमधल्या भाजपसारखेच आहे. त्यांनी बिल्कीस बानो प्रकरणातल्या आरोपींच्या सुटकेवर मौन बाळगले आहे. डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकीसाठी एमआयएम पक्ष गुजरातमधून उमेदवार देणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले की, जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली पंतप्रधान यांना बेरोजगारी, महागाई, चीनी आक्रमण, व्यापा-यांची थकलेली कर्ज याविषयी विचारले की ते इतरांवर जबाबदारी झटकतात.

अति शक्तीशाली पंतप्रधान नको
ओवैसी पुढे म्हणाले की मला असे वाटते की, देशाला आता एका कमकुवत पंतप्रधानाची गरज आहे. आम्ही शक्तिशाली पंतप्रधान पाहिलेला आहे. आता आम्हाला एका कमकुवत पंतप्रधानाची गरज आहे, जेणेकरून तो समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करेल. शक्तिशाली पंतप्रधान केवळ सबल घटकांनाच मदत करत आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत आपण हे लक्षात घ्यायला हवे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या