33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय सक्रिय रूग्णसंख्येत भारत जगात १५ व्या क्रमांकावर

सक्रिय रूग्णसंख्येत भारत जगात १५ व्या क्रमांकावर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित पहिल्या १५ देशाच्या यादीत भारत पोहचला आहे. देशात सर्वाधिक सक्रिय कोरोनारूग्णांची नोंद घेण्यात आली आहे. ३० जानेवारीला इंडोनेशिया, पोर्तुगाल तसेच आयर्लंन्डला मागे टाकत भारत १७ व्या क्रमांकावर पोहचला होता. पंरतु, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब तसेच मध्यप्रदेशमध्ये कोरोनारूग्णांची संख्या वाढली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या एका दिवसात १८ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये कोरोनामुळे कुठल्याही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. तेलंगणा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, चंदीगड, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, लडाख, मिझोरम, सिक्किम, नागालॅन्ड, अरूणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, दादरा-नगर-हवेली तसेच दमन-दीवचा त्यात समावेश आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानूसार गेल्या एका दिवसात १४ हजार २६४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ९० रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी दिवसभरात ११ हजार ६६७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे १ कोटी ९ लाख ९१ हजार ६५१ झाली आहे. यातील १ कोटी ६ लाख ८९ हजार ७१५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १ लाख ५६ हजार ३०२ रूग्णांचा (१.४२%) कोरोनाने बळी घेतला आहे. १ लाख ४५ हजार ६३४ रूग्णांवर (१.३२%) उपचार सुरू आहेत. रविवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.२५% नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार २८१ तर केरळमध्ये ४ हजार ६५० कोरोनाबाधितांची भर पडली.

आतापर्यंत १ कोटींच्यावर लसीकरण
आतापर्यंत १ कोटी १० लाख ८५ हजार १७३ लसी आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धांना लावण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर, २१ कोटी ९ लाख ३१ हजार ५३० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६ लाख ७ हजार ५० तपासण्या शनिवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

आठवड्यात दुपट्टीने वाढ
गेल्या सात दिवसांच्या दैनंदिन सरासरी कोरोनारूग्णांच्या तुलनेत गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान जवळपास १ हजारांने वाढ नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या १४ दिवसांमध्ये ५८% वाढ झाली आहे. शनिवारी केरळमध्ये ४ हजार ६५० नवीन रूग्ण आढळले. तर, शुक्रवारी राज्यात ४ हजार ५८५ रूग्ण आढळले होते.

लवकरच स्वदेशी पेट्रोल आणणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या