Tuesday, September 26, 2023

भारत जगात पाचव्या स्थानावर!

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या २ लाख ४६ हजार ५४९ इतकी झाली असून, रविवार दि़ ७ जून रोजी भारताने स्पेनलाही मागे टाकले आहे़ स्पेनमध्ये रूग्णसंख्या रुग्णसंख्या २ लाख ४१ हजार ३१० इतकी आहे. यामुळे भारत जगात पाचव्या स्थानावर गेला आहे.

आजच्या नव्या आकडेवारीनुसार अमेरिका १९ लाख ६ हजार ६०, ब्राझील ६ लाख १४ हजार ९४१, रशिया ४ लाख ५८ हजार १०२ आणि ब्रिटन २ लाख ८६ हजार २९४ यांच्यानंतर भारताचा क्रमांक येतो. कोरोनामुळे देशात गेल्या २४ तासांमध्ये २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील मृतांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. भारतात गुरुवारी ९ हजार ६५१ इतके रुग्ण आढळून आले. पण अमेरिका, ब्राझील, स्पेनच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर हा कमी आहे. देशासाठी दिलासा देणारी एवढीच बाब आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण ४ महानगरांमध्ये
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण ४ महानगरांमध्ये आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथे हे रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनाने देशातील मृतांची संख्या ७ हजारांच्या जवळपास गेली आहे़ या चार महानगरांसह अहमदाबाद, इंदूर आणि पुणे येथेही मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

Read More  रूग्णालयाच्या बिलासाठी वृध्दाला ठेवले बांधून

कुठल्या राज्यात किती रुग्ण
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८० हजारांवर गेली आहे़ तर तामिळनाडू २८ हजारांवर, दिल्लीत २६ हजारांवर, गुजरात १९ हजारांवर, राजस्थान १० हजारांवर, उत्तर प्रदेश ९ हजारांवर आणि मध्य प्रदेशात ८ हजारांवर रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये ७ हजारांवर, कर्नाटक , बिहारमध्ये आणि आंध्र प्रदेशात ४ हजारांवर रुग्ण आहेत. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झालेला नाही. मात्र, देशभरात लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने धोका कायम आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झालेला नाही. मात्र, देशभरात लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने धोका कायम आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी या संदर्भात माहिती दिली.

भारतात अनलॉकच्या माध्यमातून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, भारताच्या या निर्णयामुळे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतात अद्यापही परिस्थिती स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तवली. रेयान यांनी सांगितले की, भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव वेगवेगळा आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक आहे. दक्षिण आशियात भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही परिस्थिती अद्याप स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या