31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयडोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात येत आहे. दरम्यान, या लसीच्या डोसची नोंदणी करण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताने आतापर्यंत कोविड-१९ लसीच्या १६० कोटी डोसची नोंदणी केली आहे.

जगभरात लसीच्या ऑर्डरवर डयूक युनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्ट्सनुसार भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत युरोपियन युनियनने १५८ कोटी आणि अमेरिकेने १०० कोटींहून अधिक कोरोना लसींची नोंदणी केली आहे. जर या लसी चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्या, तर यांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरच लोकांना लसीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात येईल.

सर्वात जास्त ऑक्­सफर्ड-एस्­ट्राजेनेकाच्या वॅक्सिनची मागणी करण्यात येत आहे. अनेक देशांनी या लसीचे १५० कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफोर्डच्या लसीचा सीरम इस्टिट्यूट आणि एस्ट्रेजेनिकप्रमाणे क्लिनिकल ट्रायल करण्यात येत आहे. भारत आणि अमेरिकेने या वॅक्सिनचे ५०-५० कोटी डोस बुक केले आहेत. याव्यतिरिक्त नोवावॅक्­सच्या वॅक्सिनचे १२० कोटी डोस आतापर्यंत बुक करण्यात आले आहेत.

रशियन लसीच्या १० कोटी डोसची नोंदणी
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, भारत जुलै-ऑगस्ट २०२१ पर्यंत ५० कोटी डोस मिळवण्यासाठी वॅक्सिन निर्मात्यांच्या संपर्कात आहेत. ड्यूक युनिवर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियाच्या कोरोनावरील लसचे १० कोटी डोस आणि नोवावॅक्सच्या लसीचे १०० कोटी डोसचा करार केला आहे.

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या