29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत तिस-या स्थानावर

कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत तिस-या स्थानावर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना मृत्यूंची संख्या वाढतीच असून, आज मृतांची संख्या दीड लाखांवर गेल्याने भारत तिस-या स्थानावर आला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत ३ लाख ६५ हजार ६२० जणांनी जीव गमावला आहे. दुस-या क्रमांकावर ब्राझील असून तिथे १ लाख ९७ हजार ७७७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये आतापर्यंत १ लाख ५० हजार ११४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाच्या नव्या अवतारामुळे ब्रिटन, जर्मनीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. भारतातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येंने दीड लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंगळवारी भारतात कोरोनामुळे २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख ५० हजार ११४ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे ट्विट
भारतात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी (५ जानेवारी) ला १६ हजार ३७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हा गेल्या काही महिन्यामंधील सर्वात कमी आकडा आहे. भारतातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सलग १६ व्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी राहिली आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६.३५ टक्केंवर पोहोचला आहे. मंगळवारी देशभरात २१ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशातील ९९ हजार ९७ लाख २७२ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत १० व्या स्थानावर आहेत.

वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या