22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयलोकसंख्या वाढीत भारत लवकरच अव्वल

लोकसंख्या वाढीत भारत लवकरच अव्वल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज जागतिक लोकसंख्या दिन. २०११ साली जगाची लोकसंख्या ७ अब्ज होती. तर २०२१ मध्ये जगाची लोकसंख्या ७.८ अब्ज होती. २०३१ मध्ये जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज होईल असा अंदाज आहे.

गेल्या दशकात जगाच्या लोकसंख्येत १.१ टक्के दराने वाढत झाली. सध्या जगाची लोकसंख्या दरवर्षी ०.९ टक्के या वेगाने वाढत आहे. आफ्रिकेतील लोकसंख्या सर्वाधिक २.५ टक्के दराने वाढत आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या १४०.६६ कोटींवर पोहोचली आहे.

लोकसंख्या दरवर्षी ०.९% या दराने वाढत आहे. भारताने अनेक बाबींमध्ये बरीच प्रगती केली आहे. मात्र भारतात अद्याप बालविवाह पूर्णपणे बंद झालेले नसून २७ टक्के मुलींची लग्नं १८ वर्षांच्या आधी होतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या