22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयभारताने घेतली अग्नी-४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने घेतली अग्नी-४ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सोमवारी (ता. ६) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली ही चाचणी घेण्यात आली.

अग्नि-४ ची रेंज ४,००० किमी आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते. अलीकडेच भारतीय नौदलाने सीकिंग हेलिकॉप्टर मधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (कळफ) येथे ही चाचणी घेण्यात आली. त्याचवेळी भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या जहाजविरोधी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या