26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयभारताला मिळणार अत्याधुनिक लढाऊ विमाने

भारताला मिळणार अत्याधुनिक लढाऊ विमाने

- अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक सादर - एफ-२२ आणि एफ-३५ सारख्या विमानांचा मार्ग मोकळा

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनविरोधात भारताला काही देशांनी मदत देऊ केली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकाही सक्रिय झाली आहे. आशिया खंडात अमेरिकेने आपले सैन्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे भारताला अद्यावत लढाऊ विमाने देण्याबाबतचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास भारताला अमेरिकेकडून एफ-२२ आणि एफ-३५ सारखे अद्यावत लढाऊ विमान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आतापर्यंत हे लढाऊ विमान इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया आदी देशांकडेच आहेच. या देशांचा आणि अमेरिकाचा घनिष्ठ संबंध आहे. अमेरिकेत सत्तेवर असलेल्या रिपब्लिकन आणि विरोधी पक्षातील डेमोक्रेट पक्षाच्या दोन मोठ्या सिनेटरने भारतासोबत लष्करी संबंध आणखी घट्ट करण्यासाठी विधेयक आणले आहे. यामुळे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आणि लष्करी क्षेत्रात विकास, सहकार्य करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

विधेयक मंजूर झाल्यास भारताला मिळणार विमानांची माहिती
इस्रायल-अमेरिका द्विपक्षीय तंत्रज्ञान संशोधन आणि विकास मॉडेलच्या धर्तीवर अमेरिका-भारतात खासगी क्षेत्रात सहकार्य निर्माण होऊ शकते का, अशी विचारणा सिनेटर मार्क वॉर्नर आणि सिनेटर जॉन कॉर्निन यांनी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना केली आहे, असे झाल्यास भारत-अमेरिकेतील खासगी क्षेत्रात संरक्षणाबाबत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. सिनेटर कॉर्निन यांनी हे विधेयक मंजूर झाल्यास १८० दिवसांमध्ये भारताला अमेरिकेच्या पाचव्या पिढीच्या फायटर जेट विमानाबाबतची माहिती देण्याबाबतची सूचना केली आहे. त्याशिवाय या विधेयकानुसार, पेंटागॉनमधून दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत शिफारस आणि अन्य मुद्यांवर एक अहवाल मागितला आहे. जेणेकरून भारत स्वत: ही लढाऊ विमाने विकसित करू शकेल.

नाटो प्लस देशांच्या यादीत भारताचा समावेशासाठीही विधेयक
गोपनीय संरक्षण तंत्रज्ञान आणि उपकरण देण्यासाठी दोन्ही सिनेटरांनी आपल्या विधेयकात इस्रायल आणि न्यूझीलंड प्रमाणे नाटो प्लस देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्यासाठी एक संयुक्त विधेयकही सादर केले आहे. दरम्यान, इस्राएलकडून एक मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. इस्राएलकडून भारत तातडीने एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याची शक्यता आहे. भारत इस्राएलकडून बराक-८ एलआरएस खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढल्यानंतर काही देशांनी भारताला शस्त्राचे पाठबळ पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. राफेल विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई दलात पुढील महिन्यात दाखल होणार आहे.

Read More  भारत-पाक सीमाभागात चीनी एअरफोर्सचा सराव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या