22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home तंत्रज्ञान भारत देणार बांगलादेशला १० डिझेल रेल्वे इंजिन

भारत देणार बांगलादेशला १० डिझेल रेल्वे इंजिन

एकमत ऑनलाईन

भारताला रेल्वे तंत्रज्ञान विकून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी मिळाली

नवी दिल्ली: भारत सोमवारी २७ जुलै रोजी विशेष सोहळ्यात बांगलादेशला १० डिझेल रेल्वे इंजिन देणार आहे. पश्चिम बंगालमध्ये नदिया जिल्ह्यात हा सोहळा होणार आहे. नदियातील गेदे स्टेशन आणि बांगलादेशमधील दर्शना स्टेशन येथे विशेष सोहळा आहे.

विशेष सोहळ्याला आधी दोन्ही देशांचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष इंजिन देण्यासाठी भारतीय रेल्वेचे मोजके अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. निवडक मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारताच्या दहा ब्रॉडगेज डिझेल लोकोमोटिव्ह इंजिनमुळे बांगलादेशच्या रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. दहा इंजिनपैकी सहा इंजिन बिहारच्या समस्तीपूर रेल्वे शेडमध्ये तयार झाली आहेत. बाकीची चार इंजिन देशातील अन्य रेल्वे शेडमध्ये तयार झाली आहेत.

भारत बांगलादेशला देणार असलेल्या सर्व इंजिनची क्षमता ३३०० अश्वशक्ती  एवढी आहे. ही डब्लूडीएम ३ डी लोको  इंजिन किमान २८ वर्ष कार्यरत राहणार आहेत. व्यवस्थित देखभाल केल्यास ही इंजिन आणखी काही वर्षे कार्यरत राहू शकतात, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ताशी १२० किमी वेगाने पळण्यासाठी डिझाइन केलेल्या या इंजिनमुळे प्रवासी अथवा मालवाहतूक वेगाने होणार आहे. मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करणारी इंजिन खरेदी करण्यासाठी बांगलादेशने भारताला एक प्रस्ताव पाठवला होता. भारत सरकारने हा प्रस्ताव मंजूर करुन रेल्वे इंजिन देण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेशमधील डोंगराळ भागातल्या उंचावरील स्टेशनपर्यंत ही इंजिन सहज जा-ये करू शकतील. त्यासाठी इंजिनमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशच्या मागणीमुळे भारताला रेल्वे तंत्रज्ञान विकून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. भारताने ही संधी साधली आहे. बांगलादेश रेल्वेला भविष्यात आणखी रेल्वे सेवा देण्यास भारतीय रेल्वे उत्सुक आहे.

Read More  नागपंचमीचा सण कोरोनाच्या सावटाखाली घरीच साजरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या