30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयआशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचारात गेल्या १२ महिन्यांत वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे म्हणणे आहे. ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया या नावाने ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आपला अहवाल सादर केला आहे.

१७ देशातील २० हजार लोकांना प्रश्न
आशियातील १७ देशांतून २०,००० लोकांना प्रश्न विचारण्यात आले. जून आणि सप्टेंबर या महिन्यांदरम्यान हे सर्वेक्षण केले होते. सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा सर्वेक्षणात समावेश केला आहे. सर्वेक्षणात तीन चतुर्थांश लोकांनी त्यांच्या देशात भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.

भारतात ४६ टक्के लोकांकडून वैयक्तिक संबंधांचा वापर
सर्वेक्षणात सहभागी ६३ टक्के लोकांचे सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावले उचलत असल्याचे म्हणणे आहे. भारतात आपले काम करुन घेण्यासाठी ४६ टक्के लोक वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. सर्वेक्षणातील जवळपास निम्म्या लोकांनी लाच मागण्यात आल्याचे सांगितले. तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणा-या ३२ टक्के लोकांनी असे केले नाही तर त्यांचे काम होतच नाही,असे सांगितले आहे.

जपान,मालदीव सर्वात कमी
भारतानंतर कंबोडिया दुस-या क्रमांकावर आहे. कंबोडियातील ३७ टक्के लोक लाच देतात. यानंतर इंडोनेशियात भ्रष्टाचाराचे प्रमाण ३० टक्के असल्याने तिस-या स्थानी आहे. मालदीव आणि जपान सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश (२ टक्के) आहेत. दक्षिण कोरियात १० टक्के तर नेपाळमध्ये १२ टक्के लोकच भ्रष्टाचार करतात. सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही.

पोलिसांना ४२ टक्के पोलिसांकडून लाच
सर्वेक्षणामध्ये सामील ४२ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिल्याचे सांगितले. सरकारी ओळखपत्र मिळवण्यासाठी ४१ टक्के लोकांना लाच द्यावी लागली. ६३ टक्के लोकांना भ्रष्टाचाराची माहिती देण्यास भीती वाटते, असेही नमूद केले आहे.

शेतक-यांकडून पुन्हा तीव्र आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या