25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना रिकव्हरीत भारत अव्वल; रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक

कोरोना रिकव्हरीत भारत अव्वल; रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून, भारतातही दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. असे असले तरी दुसरीकडे एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतात हा दर आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील ९५ हजार ८८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे ९३ हजार ३३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे.
देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५३ लाखांचा टप्पा पार केला आहे, तर यापैकी ४२ लाख रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ कोरोनाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. जगभरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी १७ टक्के रुग्ण हे भारतात आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ७९.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख, ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी उचललेली पावले, यामुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्यातच १६ लाख रुग्णांची भर
आकडेवारीनुसार देशात एकट्या सप्टेंबर महिन्यातच आतापर्यंत १६ लाख ८६ हजार ७६९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच २१ हजार १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १९.१० टक्के इतकी आहे, तर देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा १.६१ टक्के आणि सकारात्मकता दर १०.५८ टक्के इतका असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना महामारी ‘देवाची करणी’, ‘आर्थिक महामारी’ कोणाची करणी?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या