19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयसाखर उत्पादनात भारत जगात अव्वल

साखर उत्पादनात भारत जगात अव्वल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत ३५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून तब्बल १०९ लाख टन साखरेची विक्रमी निर्यात केली आहे. या कामगिरीमुळे भारत साखर उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा तर निर्यातीत दुस-या क्रमांकाचा देश बनल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

निर्यातीप्रमाणेच ऊस उत्पादनातही विक्रम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ च्या साखर हंगामात ५००० लाख टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादनाचा विक्रम झाला. त्यापैकी सुमारे ३,५७४ लाख टन उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आणि सुमारे ३९४ लाख टन नैसर्गिक साखरेचे उत्पादन घेतले. याखेरीज इथेनॉल उत्पादनासाठी ३५ लाख टन साखरेचा वापर झाला तर ३५९ लाख टन साखरेचे उप्तादन झाले. या कालावधीत आतापर्यंतची साखरेची उच्चांकी म्हणजे १०९.८ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली. एवढेच नव्हे तर, इथेनॉल विक्रीतून साखर कारखाने तसेच डिस्टिलरीजना १८ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यामुळे भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला, तसेच जगातील दुस-या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश ठरला आहे.

शेतक-यांना ९५ टक्के रक्कम चुकती
साखर हंगामात कारखान्यांनी १.१८ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ऊस खरेदी केला आणि शेतक-यांना १.१२ लाख कोटी रुपये म्हणजे ९५ टक्के रक्कम चुकती ककेली असून साखर हंगामाच्या अखेरीस ६ हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे. साखर उद्योगाच्या या यशामुळे देशाला ४० हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाल्याचेही सरकारने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या