25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीय२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार

२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीरमधील बडगाम शहर टीबीमुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. हे एक ऐतिहासिक यश आहे. या दोन शहरांतून याची सुरुवात झाली असून, २०२५ पर्यंत भारत देश टीबीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदरच २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशियाचे क्षेत्रीय संचालक आणि त्यांच्या अधिका-यांशी देशातील टीबी निर्मूलनासंबंधी संवाद साधला. यावेळी या अभियानात सहभागी असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या १२० सल्लागारांशीही बातचित केली. टीबीसंबंधी जनजागृती वाढविण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक टीबी दिवस साजरा केला जातो. यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला आल्यास तात्काळ तपासणी करून घ्या.

लॉकडाऊननंतर टीबी रुग्ण कमी संख्येने रुग्णालयात पोहोचत आहेत. त्यामुळे टीबी रुग्णांची ओळख २५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शंका आल्यास तात्काळ रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. हर्षवर्धन यांनी केले. यावर्षी दिल्लीत २३ दिवसांत टीबीच्या २० हजार ३३७ रुग्णांनी नोंदणी केली. मात्र, ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत २५.३६ टक्क्यांनी घटली आहे. जागतिक स्तरावर देखील टीबी रुग्णांची ओळख २५ टक्क्यांनी घटली असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

टीबी जगातील १० मुख्य आजारांपैकी एक आहे. टीबी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने १९९३ मध्ये या रोगायाबाबत वैश्विक आणीबाणी घोषित केली होती. २०१९ मध्ये जागतिक स्तरावर १ कोटी लोकांना टीबी झाली होती. त्यामध्ये ५६ लाख पुरुष, ३२ लाख महिला आणि १२ लाख मुलांचा समावेश आहे. टीबी सर्वच देशांत आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. भारत टीबी रोगात सर्वाधिक प्रभावित देश आहे. जगात दरवर्षी १४ लाख मृत्यू टीबीने होतात. यातील एक चतुर्थांश मृत्यू एकट्या भारतात होतात. जगातील टीबीचा प्रतिचौथा रुग्ण भारतीय आहे. भारतात टीबीने सरासरी प्रतिदिन १ हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे टीबी रोग अधिक जीवघेणा असल्याचे सांगितले जाते.

भारतात टीबीला रोखण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तरीही अद्याप नियंत्रण मिळविता आले नाही. भारतात १९६२ मध्ये राष्ट्रीय टीबी नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. ३० वर्षांनंतर याचा आढावा घेतला, तेव्हा याचे अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर १९९३ मध्ये पुन्हा नव्याने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. ३० डिसेंबर २०१९ मध्ये या कार्यक्रमाचे नाव राष्ट्रीय क्षण निर्मूलन कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त देश करण्याची घोषणा केली.

टीबी भत्ता योजना फायदेशीर
देशातील ४० टक्के लोकसंख्या टीबीच्या जीवाणूंमुळे प्रभावित झालेली आहे. मात्र, देशातील टीबीची रुग्णसंख्या २७ लाख आहे. कारण पोषण आणि इम्युनिटी टीबीला रोखण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे टीबी पोषण भत्ता योजना सुरू केली. त्यानुसार टीबी रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जातात. तसेच प्रतिमाह ५०० रुपये भत्ताही मिळतो. यातून टीबी रुग्णाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होते.

टीबीवरही प्रभावी लस हवी
टीबी रुग्णांची देशात गंभीर समस्या आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व्हायला हवेत आणि प्रमाणित मेडिकलमध्येच टीबीची औषधी उपलब्ध झाली पाहिजेत. टीबीचे निदान करण्यासाठी सिरॉलॉजी टेस्टवर निर्बंध आहेत, तरीही अशा चाचण्या केल्या जातात. त्यामुळे या गोष्टींकडे तर लक्ष दिले पाहिजेच. शिवाय कोरोनाच्या संकटात जशी वेगाने लस विकसित केली, तशी टीबीला रोखण्यासाठी लस विकसित केली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

८१ टक्के रुग्ण १० राज्यांतील; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या