22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयभारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल

भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाहांनी देशातील अर्थव्यवस्थेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे वक्तव्य त्यांनी केले आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल असेही शाह म्हणालेत.

शाह पुढे म्हणाले, एवढेच नाही तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी २ लाख नवीन दुग्ध सहकारी गावे उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे. डेअरी उद्योगाने व्यावसायिकता अंगीकारली पाहिजे. या तंत्रज्ञानाबरोबरच संगणकीकरण आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब केला पाहिजे. या गोष्टींशिवाय पुढे जाणे खूप कठीण आहे. दुग्ध व्यवसायाने दुधाची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे शाह म्हणाले.

नैसर्गिक शेती जीवनरेखा
नैसर्गिक शेती ही डेअरी उद्योगाची जीवनरेखा आहे.
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसाय आणि सहकार क्षेत्राने ग्रामीण विकासात मोठे योगदान दिले आहे. नैसर्गिक शेती ही डेअरी उद्योगाची जीवनरेखा आहे त्यामुळे आरोग्य सुधारेल आणि देशाची आर्थिक स्थितीही सुधारेल असे शाहांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या