29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयऑगस्ट महिन्यात भारताला मिळणार चौथी लस

ऑगस्ट महिन्यात भारताला मिळणार चौथी लस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढाईत लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे. भारतात सध्या तीन कंपन्यांच्या लसींना परवानगी असून आता ऑगस्ट महिन्यात भारताला चौथी कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. हैदराबादमधील बायोफार्मास्युटिकल ए या कंपनीतर्फे केल्या गेलेल्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून त्यासंबंधित माहिती लवकरच समोर येणार आहे. या दोन टप्प्यांच्या अहवालानंतर ही कंपनी लसीच्या तिस-या टप्प्याकडे वाटचाल करेल.

‘बायोलॉजिकल ईने फेज १ आणि २ च्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ते पुढील काही दिवसात डेटा सुद्धा सबमिट करणार आहेत, त्यानंतर ते तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू करतील. अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी दिली. बायोलॉजिकल ई ही कंपनी बालपणी घेतल्या जाणा-या लस तयार करते. ही भारतातील टेटनस लस आणि सर्प विषाणूशी लढणा-या लसींचे सर्वाधिक उत्पादन करते.

या लसीला ऑगस्टमहिन्यापर्यंत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, ऑगस्ट महिन्यातच ही वापरासाठी उपलब्ध होणार आहे. बायोलॉजिकल ई या कंपनीत महिन्याला सात कोटी लसी तयार करण्याची क्षमता आहे, त्यामुळे ही लस वापरात येणे अतिशय सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण बाब असणार आहे, असे पॉल यांनी म्हटले आहे़ आयसीएमआरच्या माहितीनुसार बायोलॉजिकल ई दोन डोस असणा-या लसीची चाचणी करत आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनप्रमाणेच बायोलॉजिकल ई ची लस २८ दिवसांच्या अंतराने दिली जाणार आहे.

चारठाण्याच्या ८२ वर्षाच्या आजीबाईने केली कोरोनावर मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या