नवी दिल्ली : लडाखच्या डेमचॉक भागातून भारतीय लष्कराने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घतलेल्या सैनिकाकडे नागरी आणि लष्करी कागदपत्रे सापडल्याने हेरगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे.
ताब्यात घेतलेला चिनी सैनिक झीजियांग प्रांताचा रहिवाशी आहे. त्याच्याकडे लष्करी आणि नागरी कागदपत्रे होती. शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम तो करतो. पीएलएचा हा सैनिक हेरगिरीच्या मोहिमेवर होता का? त्याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. चौकशी पुर्ण झाल्यावर प्रस्थापित शिष्टाचार आणि प्रक्रियेनुसार या सैनिकाला पुन्हा चीनला सोपवण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
लडाख पुर्व सीमेवरील तणावाच्या पार्श्वभुमीवर भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत सात फेºयांची चर्चा झाली आहे. पण त्यातून ठोस काही निष्पन्न झालेले नाही. चीनने घुसखोरी केलेल्या भागांमधून प्रथम माघार घ्यावी, ही भारताची भूमिका आहे. लवकरच दोन्ही देशांच्या सैन्य आणि परराष्ट्र प्रतिनिधींमध्ये आठव्या फेरीची चर्चा पार पाडणार आहे.
शेतरस्ते मोकळे करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणार