19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय सैन्य सज्ज; १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे तैनात

भारतीय सैन्य सज्ज; १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे तैनात

एकमत ऑनलाईन

लडाख: चीनला दणका देण्यासाठी लडाखमध्ये भारताचे टी ९० आणि टी ७२ रणगाडे सज्ज झाले आहेत. चुमार डेमचोक परिसरात हे रणगाडे लढण्यासाठी सज्ज आहेत. भारताचे टी ९० आणि टी ७२ रणगाडे शून्याखाली उणे ४० अंश सेल्सिअस तापमानतही कार्यक्षम राहू शकतात. हाडे गोठवणाºया थंडीत कार्यक्षम राहण्यासाठी रणगाडे विशिष्ट प्रकारचे इंधन वापरतात. या इंधनाचा मोठा सुरक्षित साठा लडाखमध्ये आहे.

लडाखमध्ये १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे

भेदक हल्ला करुन लगेच जागा बदलून पुढील कारवाई करण्यासाठी टी ९० आणि टी ७२ रणगाडे ओळखले जातात. हे रणगाडे प्रचंड वेगाने युद्धभूमीत कार्यरत राहू शकतात. संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे जो एकाचवेळी अती थंड आणि अती उष्ण प्रदेशात रणगाड्यांच्या मदतीने लष्करी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. लडाखमध्ये १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे लढण्यासाठी सज्ज आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबरपासून लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी सुरू होते. त्यामुळे थंडीच्या दृष्टीकोनातून रणगाडे सज्ज ठेवण्याची तयारी भारतीय सैन्याने केली आहे.

पुन्हा एकदा झोजिलापेक्षा जास्त उंचीवर रणगाडे सज्ज झाले

या आधी १९४८ च्या लढाईत झोजि ला येथे ११ हजार ५५३ फूट उंचीवर भारताने रणगाडे आणले होते. एवढ्या उंचीवर रणगाडे बघून पाकिस्तानचे सैनिक आणि पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर यांनी घाबरुन वेगाने माघार घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा झोजिलापेक्षा जास्त उंचीवर रणगाडे सज्ज झाले आहेत.

भारताचे प्रशिक्षित सैनिक सज्ज

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी चिनी सैनिकांच्या नजरेला नजर देत उंच डोंगरांवर भारताच्या लष्कराने कडक पहारा ठेवला आहे. शत्रुची हालचाल दिसताक्षणी योग्य ती कारवाई करण्याचे तसेच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत. लडाखच्या पूर्वेकडील भागात उंच डोंगरांवर जवानांना नियुक्त करुन भारताने चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. रडार, उपग्रह, गुप्तचर यंत्रणा, टेहळणी पथक यांच्या मदतीने चिनी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तोफा, रणगाडे, वेगवेगळ्या क्षमतेची क्षेपणास्त्र आणि रॉकेट भारताने सज्ज ठेवली आहेत. उंच डोंगरांवर खांद्यावरुन डागता येण्याजोग्या क्षेपणास्त्रांसह भारताचे प्रशिक्षित सैनिक सज्ज आहेत.

अमेरिकेच्या युद्धनौका दाखल

चीनने अतिरेकी साहस करू नये यासाठी भारताचे लष्कर, नौदल आणि हवाई दल सामथ्यार्चा पुरेपूर वापर करत आहे. राफेल, सुखोई सारख्या आधुनिक विमानांच्या मदतीने लडाखमध्ये भारताच्या हवाई सीमेचे रक्षण केले जात आहे. दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तसेच अमेरिकेच्या काही युद्धनौका दाखल झाल्या आहेत.

कृषीमंत्री भूसे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या