28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयभारतातीय कोविड-19 लस 'कोवॅक्सिन'ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी

भारतातीय कोविड-19 लस ‘कोवॅक्सिन’ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधि महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु करण्यात येणार

देशात पुढिल महिन्यात या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने एका वक्तव्यामध्ये सांगितलं की, लस विकसित करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीचं मदत महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध उपलब्ध नाही. तसेच कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

तीन लाखांहून अधिक लोक कोरानामुक्त

देशात आतापर्यंत 548318 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोक कोरानामुक्त झाले आहेत. तर दोन लाखांहून अधिक लोक सध्या उपचार घेत आहेत. तर कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत देशात 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read More  मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या