24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय अर्थव्यवस्था तिस-या स्थानी पोहोचेल

भारतीय अर्थव्यवस्था तिस-या स्थानी पोहोचेल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत जगातील पाचवी सर्वात मोठ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारत जागतिक पातळीवर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर एका नव्या अहवालानुसार भारत लवकरच जगातील तिस-या क्रमांकांची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल. भारतीय स्टेट बँकेच्या एका रिपोर्टनुसार भारतीय अर्थव्यवस्था येत्या काळात जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर पोहोचेल. या शतकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखी व्यापक होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च डिपार्टमेंटच्या नव्या अहवालानुसार भारत येत्या काळात अनेक महासत्तांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार २०२७ पर्यंत भारत जर्मनीच्या पुढे जाईल आणि २०२९ पर्यंत जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल. सध्या जागतिक क्रमवारीत जर्मनी चौथ्या आणि आणि जपान तिस-या स्थानावर आहे. अशा प्रकारे या दशकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्था अधिक विस्तार करत जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर पोहोचेल, असेही अहवालात म्हटले आहे.

सध्या पाचव्या क्रमांकावर
ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचे राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. भारत आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या