21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकंदहारमधील भारतीय दूतावास बंद

कंदहारमधील भारतीय दूतावास बंद

एकमत ऑनलाईन

कंदहार : अमेरिकन सैन्याने परतीचा रस्ता धरताच अफगाणिस्तानात तालिबानने डोके वर काढले असून, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला. या दाव्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हे दिसत आहे. यातच अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये असलेला भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही तासांतच तालिबानने अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग ताब्यात घेतल्याचे म्हटले होते़ तालिबानचे वाढत वर्चस्व लक्षात घेऊन अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, राजनैतिक सूत्रांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले असून, दूतावास पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील
अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला आहे. या दाव्यानंतर अफगाणिस्तान सरकारने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. हैरात प्रातांतील गुजारा जिल्ह्याच्या सीमेवर नागरिकांची तपासणी करताना अफगाणिस्तानी सुरक्षा दलाचे जवान. भारत सरकारने अफगाणिस्तानातील कंदहार येथे असलेले भारतीय दूतावास कार्यालय बंद केलेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचा-यांची संख्या कमी करण्यात आली आहे. दूतावासात आता फक्त अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. दूतावास बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे, असे राजनैतिक सूत्रांनी म्हटले आहे.

किनवट-नांदेड पर्यायी रस्ता पाण्यात बुडाला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या