23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयभारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक!

भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक!

एकमत ऑनलाईन

348 मोबाईल ऍप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या ऍप्सचाही समावेश
नवी दिल्ली : भारत सरकारने मोठे डिजिटल स्ट्राइक करत ३०० हून अधिक मोबाईल ऍप्स ब्लॉक केले आहेत.

भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये तयार करण्यात आलेले जवळपास ३४८ मोबाईल ऍप्स नागरिकांच्या प्रोफायलिंगसाठी युजर्सची माहिती गोळा करून परदेशात पाठवत असल्याचे सांगत, ब्लॉक केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाजपचे रोडमल नागर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

देशाबाहेर पाठवत होते डेटा
चंद्रशेखर म्हणाले, हे ऍप्स ३४८ मोबाईल ऍप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते. ते म्हणाले, ‘एमएचए’च्या विनंती वरून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने असे ३४८ मोबाईल ऍप्स ब्लॉक केले आहेत. कारण अशा पद्धतीचे डेटा ट्रांसमिशन म्हणजे, भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे, तसेच भारताच्या आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन आहे.

चीनमध्ये तयार झाले आहेत काही ऍप्स
यावेळी, हे सर्व ऍप्स चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत? असे विचारले असता, चंद्रशेखर म्हणाले, हे ऍप्स चीनसह विविध देशांत तयार करण्यात आले आहेत. यापूर्वीही भारत सरकारने अशा पद्धतीची कारवाई करत डिजिटल स्ट्राइक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या