22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयएलएसीजवळ चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखले

एलएसीजवळ चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखले

एकमत ऑनलाईन

लेह : पूर्व लडाखमधील डेमचोक भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (छअउ) एक आठवड्यापूर्वी चिनी सैन्याने भारतीय मेंढपाळांना पुढे जाण्यापासून रोखले. या घटनेची माहिती भारतीय लष्करीय अधिकाऱ्यांनी दिली. या मुद्द्यावर भारतीय लष्कराने चीनशी चर्चा केली आहे.

याबाबत माहिती अशी की, या भागातील ग्रामस्थ शतकानुशतके आपली जनावरे चरायला जात असत, तेथे चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना जाण्यापासून रोखले आहे. तो भाग पूर्णपणे भारताच्या ताब्यात होता. मात्र पूर्व लडाखमधील एलएसीवरील तणावादरम्यान अशी घटना प्रथमच घडली आहे. डेमचोक परिसरात चिनी सैन्याच्या येण्यावरून दोन्ही देशांत वाद सुरू असला तरी आता चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना पुढे येण्यापासून रोखले आहे. डेमचोकमधील सादल खिंडीजवळील जमीन हा चिनी सैनिकांनी आपला दावा केला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तेथील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या चीनशी चर्चा केली आहे.

या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणतीही चकमक झाली नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. हे तेच क्षेत्र आहे जिथे गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये चकमक सुरू आहे. चिनी सैन्याच्या आडमुठे धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्करानेही या भागात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि प्रादेशिक कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे परिसराला भेट देत आहेत. पूर्व लडाखमधील डेमचोक भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एक आठवड्यापूर्वी चिनी सैन्याने भारतीय मेंढपाळांना पुढे जाण्यापासून रोखले. डेमचोक परिसर चीनचा असल्याचे सांगत चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना तेथून निघून जाण्यास सांगितले. २१ ऑगस्ट रोजी चिनी सैनिकांनी हे कृत्य केले. या मुद्द्यावर भारतीय लष्कराने चीनशी चर्चा केली आहे

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी पुन्हा एकदा सांगितले की, सीमेची परिस्थिती भारत आणि चीनमधील संबंध निश्चित करेल. परस्पर संवेदनशीलता, परस्पर आदर आणि परस्पर हित यावर आधारित संबंध असायला हवेत, यावरही त्यांनी भर दिला. भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील सीमेवर गेल्या दोन वर्षांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. चकमकीच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या