मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतराच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या लंडन दौ-यावर आहेत. नुकतेच, लंडनमध्ये त्यांचा ‘इंडिया ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने ब्रिटीश संसदेत सन्मान करण्यात आला.
ब्रिटनच्या संसदेत अमृता फडणवीस यांनी ‘इंडो-यूके संबंध’ या विषयावर व्याख्यान दिले आणि ब्रिटनच्या संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने भारत-यूके संबंध मजबूत झाले आहेत. तसेच, हेच संबंध विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरही विस्तारत आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले.