28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांच्या हस्ते स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांतचे लोकार्पण होणार

पंतप्रधानांच्या हस्ते स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांतचे लोकार्पण होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ सप्टेंबरला कोचित शिपयार्ड लिमिटेड मध्ये देशातील पहिली स्वदेशी विमानवाहक आयएनएस विक्रांत चालू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगितले आहे की मोदी हे कार्यक्रमाच्या निमित्ताने १ आणि २ सप्टेंबरला कर्नाटक ,केरळ, मध्ये दौरा करणार आहेत आणि येथील कोचित विमानतळा जवळ कलाडी गावात भारतीय विद्वान आदि शंकराचार्य यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत.

त्यानंतर मंगलुरू मध्ये सुमारे ३,८०० करोड रूपयांच्या योजनेचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पीएमओने म्हटले आहे की मोदी हे आत्मनिर्भरतेचे खंबीर समर्थक आहेत, खास करून धोरणात्मक क्षेत्रांमध्ये. आयएनएस विक्रांत चालू होणे हे एका दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्वदेशी बनावटीची ही पहिली विमानवाहू युद्धनौका असेल.

भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाईन ब्युरोद्वारे डिझाइन केलेले आणि सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कोचीन शिपयार्डने तयार केलेले, विक्रांत हे अत्याधुनिक ऑटोमेशन सुविधांनी तयार केलेले आहे. आणि ते सागरी क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या