27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयभारत राबविणार पहिली सागरी मानवी मोहीम

भारत राबविणार पहिली सागरी मानवी मोहीम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत सन २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. यासंदर्भातील माहिती अंतराळ आणि पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली आहे. समांतरपणे २०२३ मध्ये भारत अंतराळात मानवी मोहीम आणि पहिली सागरी मानवी सागरी मोहीम गंगायान या नावाने राबवणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली.

जागतिक सागरी दिनानिमित्ताने दिल्लीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की. सागरी आणि अंतराळ मानवी मोहिमेची चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरत पूर्णत्वास जाणार आहे. २०२३ मध्ये या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. सागरी मोहिमेतील उथळ पाण्यातील चाचणी २०२३ च्या सुरूवातीला होणार आहे. मत्स्य ६००० याद्वारे ही चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच खोल पाण्यातील सागरी मानवी माहिमेची चाचणी ही २०२४ मध्ये
होण्याची शक्यता आहे असे अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.

मानवी रोबोट अवकाशात पाठविणार
गंगायान मोहिमेची एक मोहिम या वर्षीच्या दुस-या टप्प्यात होणार आहे. या मोहिमेद्वारे इस्त्रोने विकसित केलेल्या मानवी रोबोट व्हीयोमित्राद्वारे अवकाशात पाठवला जाणार आहे. आणि पहिली मानवी अंतराळ मोहिम २०२३ मध्ये पार पडेल असे ते म्हणाले.

निळे आर्थिक धोरण राबविणार
तसेच सरकार निळे आर्थिक धोरण राबवणार आहे. त्याद्वारे २०३० पर्यंत सागरी उद्योगात तब्बल ४० दशलक्ष लोकांना रोजगार देण्यात येणार आहे असे मंत्र्यांनी सांगितले आहे. सरकारने जून २०२१ मध्ये खोल सागरी मोहिमेसाठी मंजूरी दिली होती. त्यासाठी ४ हजार ७७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. अशी माहिती सिंग यांनी दिली.

तब्बल ६००० मीटर समुद्रात खोलवर जाणार
या मोहिमेद्वारे सागरातल्या १ हजार ते ५ हजार ५०० मीटर पर्यंतच्या खोलीतील सजीव आणि निर्जीव गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. सागरी उद्योगाला चालना मिळण्यासाठी सरकार सागरी मोहिमेसाठी आणि संशोधनासाठी प्रोत्साहन देत असे सिंग यांनी बोलताना सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या