19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयभारताचा ट्विटरला कडक इशारा

भारताचा ट्विटरला कडक इशारा

संवेदनशील राहण्याचा सल्ला ; नकाशात मोडतोडीचे प्रकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: केंद्रशासित प्रदेश असलेल्या लेहचे लोकेशन चीनमध्ये दाखवल्याप्रकरणी भारताने ट्विटरला कडक इशारा दिला आहे. केंद्र सरकारने ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना या प्रकरणी संवेदनशीलतेने काम करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारचे आयटी सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना या प्रकरणी पत्र लिहिले आहे. पत्रात ट्विटरद्वारे भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ट्विटरने १८ आॅक्टोबर या दिवशी आपल्या प्लॅटफॉर्मवर लेहचे जिओ टॅग लोकेशनमध्ये जम्मू आणि काश्मीर चीनमध्ये दाखवले होते.

आयटी सचिवांनी ट्विटरला इशारा देत लेह हा केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. लडाख आणि जम्मू आणि काश्मीर भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि हे भाग भारतीय राज्यघटनेद्वारे शासित आहेत. ट्विटरने भारतातील लोकांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे, असे आयटी सचिव अजय साहनी यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

सार्वभौमत्व-अखंडतेचा अपमान मान्य नाही
ट्विटरने भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही आणि हे कायद्याचे उल्लंघन देखील आहे, असे भारताने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे ट्विटरच्या विश्वासार्हतेला तडा जातो. शिवाय ट्विटरची तटस्थता आणि निष्पक्षतेवर देखील प्रश्न उपस्थित होतात,असे आयटी सचिवांनी पत्रात म्हटले आहे.

घारी गावच्या झोंबाडे कुटुंबियांसाठी डीवायएसपी व तहसील कार्यालयावर मातंग समाजाचा मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या