33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय भारताची भूटान, मालदिवला लसीची मदत

भारताची भूटान, मालदिवला लसीची मदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताने नियंत्रण मिळवले आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघे जग भारताकडे आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावले टाकत आहे. नुकताचे भारताने भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत. भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो.

आजवर भारताने जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. कोरोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारताने भेट स्वरुपात लस पाठवली आहे.

पार्थो दासगुप्ताचा जामीन फेटाळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या