30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयभारताचा जलद लसीकरणाचा जागतिक विक्रम

भारताचा जलद लसीकरणाचा जागतिक विक्रम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील नागरिकांना लसीच्या १० कोटी मात्रा देत कोविड-१९ विषाणूला रोखण्याच्या कामी भारताने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार देशभरात लसीच्या एकूण १०,१२, ८४,२८२ मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणाची व्याप्ती ४५ वर्षे त्यापुढील वयाच्या लोकांसाठी वाढवत त्याशिवाय या वयोगटासाठी सरकारी व खासगी कामाच्या जागी लसीकरणाची सोय करुन देण्यास मुभा असे अनेक महत्वाचे निर्णय, सहयोग व समन्वयाच्या भूमिकेतून केंद्र व राज्यांनी कोविडच्या विळख्यातून मोलाचे जीव वाचावेत म्हणून घेतले. परिणामकारक औषधोपचार व्यवस्थापनामुळे ंिहदुस्थानचा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे १.२८% राहिला.

ही बाब सकल समाज या भूमिकेची साक्ष देणारी आहे. अफवा आणि एखाद्याच्या फायद्याच्या हेतूने केलेली दिशाभूल याला बळी न पडता लोकांनी लसीबाबतची उदासिनता सोडून कोविड-१९ च्या उच्चाटनासाठी व्यवस्थापनाला मदतीचा हात दिला. कोविड-१९ मुळे देशातील जोखीम असलेल्या अनेक गटांना संरक्षण देणारी व्यवस्था मिळाली तसेच या गटांचे उच्च स्तरावरून वारंवार पुनरावलोकन व परीक्षण केले जाईल.

एकूण १० कोटी मात्रांचे व्यवस्थापन वेगाने व्यवस्थापन करणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश आहे. १०० दशलक्ष मात्रा देण्यासाठी अमेरिकेने ८९ दिवस तर चीनने १०३ दिवस घेतले. ८५ दिवसात मिळवलेल्या या यशाची इतर देशांशी तुलना करताना भारताचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे हे महत्वाचे. अमेरिकेने ८५ दिवसांमध्ये ९२.०९ दशलक्ष मात्रा तर चीनने ८५ दिवसात ६१.४२ दशलक्ष मात्रा दिल्या.

एकूण १५,१७,२६० सत्रात देण्यात आलेल्या १०.१२ कोटी मात्रांमध्ये लसीची पहिली मात्रा घेणा-या ९०,०३,०६० आरोग्यकर्मचा-यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणा-या ५५,०६,७१७ आरोग्य कर्मचा-यांचा तसेच, लसीची पहिली मात्रा घेणा-या आघाडीवर काम करणा-या ९९,३९,३२१ कर्मचा-यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणा-या आघाडीवर काम करणा-या ४७,२८,९६६ कर्मचा-यांचा, लसीची पहिली मात्रा घेणा-या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ३,०१,१४,९५७ लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणा-या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ६,३७,७६८ लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणा-या ६० वर्षावरील वयोगटातील ३,९५,६४,७४१ लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणा-या ६० वर्षावरील वयोगटातील १७,८८,७५२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

शव्यापी लसीकरणाच्या ८५ व्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत लसींच्या २९,६५,८८६ मात्रा देण्यात आल्या. प्राथमिक अहवालातील माहितीनुसार यापैकी २६,३१,११९ लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर ३,३४,७६७ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

बलात्कारी कुलदीप सेंगरच्या पत्नीचे तिकीट रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या