26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयगर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लवकरच स्वदेशी लस

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लवकरच स्वदेशी लस

एकमत ऑनलाईन

पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात पहिली स्वदेशी क्वाड्रिव्हॅलेंट ूमन पॅपिलोमाव्हायरस लस तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी त्यांनी बाजारात लसीची परवानगी मिळवण्यासाठी भारतीय औषध नियामक मंडळाकडे अर्ज केला आहे.

त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविधात लवकरच भारतीय बनावटीची लस उपलब्धता होणार आहे. याची सुनिश्चिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्याने सीरमने २/३ क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना दिलेल्या अर्जात, सीरमचे विभागीय संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी उएफश्अश्अउ या लसीसंदर्भात माहिती दिली आहे.

सीरमच्या लसीने कर्करोगास कारणीभूत असणा-या विषाणूविरोधात १००० पट जास्त प्रतिपिंड तयार केली आहेत. या प्रतिसादामुळे डॉक्टरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा प्रकार सर्व वयोगटांमध्ये लागू होतो. सीरमने बुधवारी या लसीचा डेटा आणि उपयुक्ततेचा आढावा घेण्यासाठी एनडीएजीआयने स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी प्रेझेंटेशन देण्यात आले. डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली हे सादरीकरण करण्यात आले.

महिलांना मिळणार दिलासा
१५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक होणा-या कर्करोगात भारतातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दुस-या क्रमांकावर आहे. यासोबत हे पण लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या आपला देश लसीसाठी पूर्णपणे परदेशी उत्पादकांवर अवलंबून असल्याचे विभागीय संचालक सिंग यांनी सांगितले. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध औषधे आणि लसी उपलब्ध करून देण्याचा कायम प्रयत्न केला आहे.

पहिल्या स्वदेशी लसीचे प्रयत्न सुरू
उच्च दर्जाची मेड इन इंडिया लस आपल्या देशातील आणि जगभरातील लोकांसाठी परवडणा-या किमतीत, उपलब्ध करण्याचे आमचे लक्ष्य आहे असे ते म्हणाले. इतर अनेक स्वदेशी जीवरक्षक लसींप्रमाणेच भारतातील पहिल्या स्वदेशी ०ऌढश् लसीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वदेशी आणि कॉल फॉर लोकलचे स्वप्न साकार होईल. मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्डचे उद्दिष्ट सुद्धा यामुळे साध्य करता येणार असल्याचे सीरमच्या अधिका-यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या