23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट

भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे.

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना सिक्किममध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी झाली आहे. माध्यमातील माहितीनुसार, उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये तीन दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारताने चोख प्रत्युत्तर देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेत दोन्ही देशांचे जवान जखमी झाल्याचे कळत आहे.

मागील आठवड्यात उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दोन्ही देशांच्या झटापटीत चीनचे जवळपास २० सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे, तर भारताचे ४ सैनिक जखमी झाले आहेत.

भारतीय सैनिक उत्तर सिक्किमच्या प्रतिकुल परिस्थितीतही चिनी सैनिकांना मागे खदडण्यात यशस्वी झाले. असे असले तरी याठिकाणी तणाव कायम आहे, पण सध्या स्थिती स्थिर आहे. भारत-आणि चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये नववी चर्चेची फेरी नुकतीच पार पडली आहे. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. असे असताना ही झटापट घडून आली आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची स्थिती आहे.

भारत-चीन सैनिकांमधील झटापटीच्या माध्यमातील बातमीनंतर भारतीय लष्कराने यावर भाष्य केले आहे. भारतीय लष्कर आणि चीनच्या पीएलएमध्ये छोटी झटापट झाली. नाकू ला येथे २० जानेवारीला सैन्य आमनेसामने आले होते. प्रोटोकॉलनुसार वाद स्थानिक कमांडर स्तरावर सोडवण्यात आला आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मागील वर्षी उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्येच उभय देशांमध्ये झडप झाली होती. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण, चर्चेनंतर वाद काहीप्रमाणात निवळला होता.

 

म्हणून आताच लस घेणार नाही; पवारांनी सांगितले कारण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या