22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयइंडो-इस्लामिक ट्रस्ट देणार योगींना आमंत्रण

इंडो-इस्लामिक ट्रस्ट देणार योगींना आमंत्रण

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात अयोध्येत राम मंदिरासोबतच मशिदीचं निर्माण होणार आहे. यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने इंडो – इस्लामिक कल्चर फाउंडेशन ट्रस्ट गठीत केली आहे़ ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, ५ एकर जमिनीवर प्रस्तावित मशिदीच्या परिसरात उभे राहणा-या रुग्णालय, शाळा, कम्युनिटी किचन, लायब्ररी आणि इतर जन सुविधांच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

उत्तर प्रदेशात सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डद्वारे अयोध्येत मशीद निर्माणाची सुरुवात लवकरच होणार आहे. मशीद तसेच, अन्य निर्माणासाठी गठीत ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनानंतर वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर बनणाºया जन सुविधांच्या शिलान्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाईल़ तेव्हा मशिदीच्या शिलान्यासासारखे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही.

या जमिनीवर जनतेसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत आणि जनतेला सवलती देण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते़ यामुळे शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित केले जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे़

आमंत्रित करण्याच्या वृत्ताला दुजोरा
इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी धानीपूर गावात उभ्या राहणाºया मशिदीच्या साईटवर मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे़ इस्लामचे चारही शाळा हनफी, हंबली, शाफई आणि मालिकीमध्ये मशिदीच्या शिलान्यासाची कोणतीही तरतूद नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हटले होते योगी?
उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना तुम्हाला वाटते की मला आमंत्रित करण्यात येईल? जरी मला बोलावण्यात आलं तरीदेखील मी जाणार नाही असे म्हटले होते.

दवणहिप्परग्यात रुग्णसंख्या नऊ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या