26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयमहागाईचा भडका उडणार

महागाईचा भडका उडणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे रुपयाला मोठा फटका बसला आहे. चलन बाजारात आज गुरुवारी ९ जून २०२२ रोजी डॉलरसमोर रुपयाने ७७.८१ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. यापूर्वी १७ मे २०२२ रोजी रुपयाने ७७.७९ रुपयांचा तळ गाठला होता.

कच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहील, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन रोखण्याठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात असल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ केली होती. महागाईला वेसण घालण्यासाठी बँकेकडून व्याजदर वाढीला प्राधान्य देण्यात आले. मात्र रुपयातील अवमूल्यन रोखण्यात बँकेला अपयश आले आहे.

परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडणार?
भांडवली बाजारात चौफेर विक्री असून परदेशी गुंतवणूकदारांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी २,४८४ कोटी बाजारातून काढून घेतले. दरम्यान, जागतिक बँकेने विकास दराची सुधारित आकडेवारी जाहीर केली आगे. त्यात विकास दर २.९ टक्के राहील, असे बँकेन म्हटले आहे. ज्याचा फायदा डॉलर इंडेक्सला झाला.

डॉलर इंडेक्स १०२.५५ वर
डॉलर इंडेक्स ०.०१ टक्के वाढीसह १०२.५५ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर बाँड यिल्डमध्येदेखील सुधारणा झाली. रुपयातीन अवमूल्यनाने आयात बिलांचा खर्च भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय टीव्ही, एसी, फ्रिज, कॉम्प्युटर्स, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या