23.9 C
Latur
Monday, October 26, 2020
Home राष्ट्रीय बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

एकमत ऑनलाईन

अयोध्या : बाबरी खटल्यावर सीबीआय चे विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी होते. लखनौमधील कोर्टात सकाळी 11 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात झाली. जवळपास दीड तासांनी म्हणजे 12.30 वाजता या घटनेचा निकाल आला. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते.

32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित
न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, ज्यापैकी 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे.

या आरोपींची निर्दोष मुक्तता
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर

आपण आनंदी : अडवाणी
बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते, असे भाजप नेते लालकृष्ण अडवणी म्हणाले.

षडयंत्र नसल्याचे सिद्ध : जोशी
आमचे आंदोलन कोणतेही षडयंत्र नव्हते, हे सिद्ध झाले. आम्हाला खुप आनंद झाला आहे. न्यायालयाने आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे आणि संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागले पाहिजे, असे मुरली मनोहर जोशी म्हणाले.

बाबरीबाबतच्या निर्णयाला आव्हान देणार- जिलानी
बाबरी मशिद पाडली जाण्याच्या प्रकरणी सर्व 32 आरोपींची विशेष न्यायालयाकडून मुक्‍तता केली जाण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ विधीज्ञ आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य झफरयाब जिलानी यांनी दिली आहे. साक्षीदारांचे हजारो जबाबांची नोंद आहे. गुन्हेगारी प्ररकरणांमध्ये त्यांना महत्व असते. हा जबाब नोंदवणाऱ्यांमध्ये आयपीएस्‌ अधिकरी आणि पत्रकारांचाही समावेश आहे. प्रक्षोभक भाषणे दिली जात असताना आरोपी मंचावर बसलेले होते, असे या जबाबामध्ये म्हटले होते, असे जिलानी यांनी सांगितले.

बाबरी प्रकरणाचा असा आहे इतिहास

  • १५२८ : मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते.
  • १८५३ : इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली.
  • १८५९ : इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान तर बाहेरील भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी दिली.
  • १९४७ : वाद झाल्यानंतर सरकारने मुसलमानांना या स्थळावर जाण्यास बंदी घातली. हिंदुंना जाण्याची परवानगी होती.
  • १९४९ : येथे राम ललाची मूर्ती मिळाली. त्यानंतर वाद उद्भवला आणि आंदोलन सुरू झाले. त्यावेळी मुस्लिम समुदायाकडून हाशिम अन्सारी तर हिंदूंकडून महंत परमहंस रामचंद्र दास यांनी खटले दाखल केले.
  • १९५० : राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख रामचंद्र दास आणि गोपालसिंह विशारद यांनी फैजाबादमध्ये खटला दाखल करून हिंदूंना पूजा करण्याची परवानगी मागितली होती.
  • १९६१ : सुन्नी केंद्रीय मंडळाने खटला दाखल करून परिसरातील सर्व भाग हा कब्रस्तान (दफनभूमी) असल्याचा दावा केला.
  • १९८४ : विश्व हिंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली एक गट बनवला.
  • १९८६ : फैजाबाद न्यायालयाने दरवाजा उघडण्याची परवानगी दिली आणि ंिहदुंना पुजा करण्याची संधी मिळाली.
  • १९८९ : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास करण्याची परवानगी दिली.
  • १९९० : लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली.त्यांना समस्तीपूर येथून अटक करण्यात आली. त्यावेळी भाजपने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
  • ६ डिसेंबर १९९२ : कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि तात्पुरते मंदिर बनवले. पी. व्ही. नरसिंहराव सरकारने उच्च न्यायालयात धाव घेऊन येथील बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी केली.
  • २००३ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त स्थळाची खोदाई करून तेथे मंदिर होतेकिंंवा नाही, याचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुरातत्व विभागाने मशिदीच्या खाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळाल्याचे म्हटले.
  • २०१० : पहिल्यांदा सरकारने निर्णय बदलत दोन्ही पक्षांनी हे प्रकरण परस्पर मिटवण्यास सांगितले.
  • ३० सप्टेंबर २०१० : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत जमिनीचे तीन हिस्से करण्यास सांगितले.
  • २०१६ : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मंदिराच्या निर्मितीची याचिका दाखल केली.
  • १८ एप्रिल २०१७ : सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह १७ जणांवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी दिली.
  • ८ मार्च २०१९ : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि ८ आठवड्यात समितीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे म्हटले.
  • १८ सप्टेंबर २०१९ : रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या लांबलेल्या वादात सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑक्टोबरची मुदत निश्चित केली.
  • १६ ऑक्टोबर २०१९ : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर निकाल राखून ठेवला आणि २३ दिवसांच्या आत निकाल देणार असल्याचे सांगितले.
  • ९ नोव्हेंबर २०१९ : राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल, असे घटनापीठाने सांगितले. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल, असे म्हटले.
  • ५ ऑगस्ट २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. पर्णकुटीत राहणा-या रामलल्लाचे भव्य मंदिर उभारू, असे ते म्हणाले.
  • ३० सप्टेंबर २०२० : १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

पाच ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बार, राज्‍यांतर्गत रेल्वे, पुणे लोकल सुरु होणार !

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

सातबारा उतारा काढण्याची शासनाची वेबसाईट बंद सर्वर डाऊन

सांगोला (विकास गंगणे) : संपूर्ण महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये...

वैद्यकीय अधिकाऱ्या अभावी पारगाव चे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पारगाव परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वारंवार गैरहजर राहणाऱ्या...

आणखीन बातम्या

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

मुफ्तींच्या विरोधात तिरंगा रॅलीचे आयोजन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवार दि़...

मुख्यमंत्री ठाकरे ‘नेपोटिझम प्रॉडक्ट’ – घराणेशाहीवरून कंगणाचा ‘ट्विटवॉर’

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेपोटिझम प्रॉडक्ट असल्याची टीका अभिनेत्री कंगना रानावत हिने सोमवार दि़ २६ आॅक्टोबर रोजी ट्विट करीत केली आहे. शिवसेनेच्या दसरा...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...