23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयऑक्सिजनअभावी मृत्यूची माहिती देण्याचे राज्यांना निर्देश

ऑक्सिजनअभावी मृत्यूची माहिती देण्याचे राज्यांना निर्देश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूची वेगळी आकडेवारी कळविण्याची सूचना केंद्राने आता राज्य सरकारांना केली आहे. ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाकडे १३ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर केंद्र सरकारकडून आकडेवारी जाहीर केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले. ही आकडेवारी याच अधिवेशनात संसदेसमोर सादर केली जाईल, असे मोदी सरकारने अगोदरच स्पष्ट केले होते. नियोजनानुसार १३ ऑगस्ट हा अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे.

कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही, या सरकारच्या संसदेतील उत्तराने मोठा वाद झाला. दुस-या लाटेत व्हेंटिलेटर ,औषधे, ऑक्सिजन याबाबत राज्यांकडून आलेल्या मागण्यांमध्ये फार मोठी वाढ झाली. राज्यांना ऑक्सिजनचा वेळेत पुरवठा होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. कोरोना अजून गेलेला नाही आणि या काळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णालये, औषधांचा पुरवठा ही मोठी आव्हाने आहेत. कोणीही याबाबत राजकारण करणे योग्य नाही, असे मंत्री म्हणूनच नव्हे तर एक डॉक्टर म्हणून माझे प्रामाणिक मत आहे.

महाराष्ट्राला ४ कोटी डोस
देशातील ३४ कोटी ४० लाख लोकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला आतापावेतो सुमारे ४ कोटी डोस केंद्राने दिले आहेत. केंद्राने आगामी काळात आणखी १०० कोटी डोसची ऑर्डर नोंदवली आहे.

नियम पाळण्यात हलगर्जी नको
डॉ. पवार यांनी म्हटले, की लस आली तरी या विषाणूला कोणीही गृहित धरू नये. मास्क, हातांची स्वच्छता आणि सामाजिक भान ही त्रिसूत्री प्रत्येकाने कटाक्षाने पाळायलाच हवी. गर्दीच्या ठिकाणी आरोग्य नियम पालन करण्यात जो हलगर्जी दिसते ती चिंताजनक आहे आणि हे आपल्याला परवडणारे नाही. ते कसे हे महाराष्ट्रात पुन्हा वाढणारी आकडेवारी दाखवून देत आहे.

 

पी.व्ही.सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या