नवी दिल्ली: दिल्लीत शेतकरी आंदोलनात २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला गेला, ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दुखी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदींनी रविवारी मन की बातमधून दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारावर टिप्पणी केली.मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचार करणा-यांना इशारा दिला आहे.
अपमान करणाऱ्याला अटक करा : टिकैत
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातमधील वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचे राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्याने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे, त्याला अटक करा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. नव्या कृषि कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतक-यांमधील चर्चा बंदुकीच्या धाकाखाली होणे शक्य नाही अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर केंद्र सरकारकडून आतापर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आले नव्हते. पंतप्रधान मोदीही यावर मौन बाळगून होते. पण आज मन की बातमध्ये पंतप्रधानांनी २६ जानेवारीच्या घटनेवर भाष्य केले व दंगेखोरांना इशारा दिला.
महावितरणच्या चुकीमूळे उत्पादन घटणार