29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयभाजपा नेत्या शाझिया इल्मी यांना शिवीगाळ

भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांना शिवीगाळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या शाझिया इल्मी यांनी बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार अकबर अहमद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दिल्लीत वसंत कुंज येथे चेतन सेठ यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात अकबर अहमद यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप शाझिया इल्मी यांनी केला आहे. पोलिसांनी शाझिया इल्मी यांच्या तक्रारीवरुन अकबर अहमद यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकावणे) आणि कलम ५०९ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. शाझिया इल्मी दिल्ली भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे.

मला या विषयाला जास्त प्रसिद्धी द्यायची नाही. माझ्यासोबत गैरवर्तन आणि माझी छळवणूक केल्याबद्दल मी अहमद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. चेतन सेठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी अकबर अहमद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते माझा अपमान करत होते. हिंदीमध्ये त्यांनी मला शिवीगाळ केली. असे लोक सुटता कामा नयेत, त्यांना अद्दल घडली पाहिजे असे शाझिया इल्मी म्हणाल्या. या विषयावर अकबर अहमद यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्हाला तक्रार मिळाली आहे. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करु, असे दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह म्हणाले.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या