नवी दिल्ली : कमर्चारी भविष्य निर्वाह निधीवर २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय ईपीएफओ संघटनेच्या विश्वस्तांनी आज घेतला. कोरोना संकटात केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट झाली होती. तसेच या काळात कर्मचा-यांनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती. त्यामुळे पीएफवरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच ८.५ टक्के कायम ठेवला असून त्यामुळे जवळपास ६ कोटी पीएफ सभासदांना दिलासा मिळाला आहे.
कमर्चारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाची आज श्रीनगर येथे बैठक पार पडली. यात चालू आर्थिक वर्षासाठी (२०२०-२१) ८.५ टक्के व्याजदर देण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान ८.५ टक्के व्याजदर हा २०१२-१३ नंतरचा सर्वात कमी व्याजदर आहे. कोरोना संकट काळात गेल्या वर्षभरात जवळपास २ कोटी पीएफ सभासदांनी पीएफ फंडातून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ७३००० कोटी काढले होते. त्यात मार्चअखेर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०१९ मध्येदेखील १ कोटी ६३ लाख सभासदांनी पीएफमधून ८१२०० कोटी काढले होते. सलग २ वर्षे पीएफमधून मोठी रक्कम काढल्याने पीएफ फंडातील शिल्लक कमी झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओच्या उपाययोजना
केंद्र सरकारने कोव्हिड-१९ संसर्गाशी मुकाबला करताना पैशांची चणचण भासू नये, यासाठी अनेक उपाय केले होते. त्यापैकी भविष्यनिर्वाह निधी योगदान ३ महिन्यांसाठी १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणून कर्मचा-यांच्या हातात अधिक वेतन यावे, अशी सोय केली होती.
२ टप्प्यांत व्याजदर जमा
आर्थिक चणचण असल्याने सरकारने २०१९-२० या वर्षासाठीचा व्याज २ टप्प्यांत सभासदांच्या खात्यात जमा केले होते. २०१९-२० या वर्षासाठी ईपीएफओ सदस्यांना ८.५० टक्के व्याज देण्यात आले होते. त्यातील ८.१५ टक्के तूर्त आणि नंतर उर्वरित ०.३५ टक्के व्याजाची रक्कम अदा करण्यात आली होती.
देशात लस मिळेना, विदेशात विक्री कशी?