37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वार्षिक आंतरराष्ट्रीय उर्जासंमेलन सेरावीक कॉन्फरन्स २०२१मध्ये ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना सहभागी देशांनी सेरावीक वैश्विक उर्जा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारप्राप्तीबद्दल सर्व सदस्य देशांचे मोदींनी आभार मानले व हा पुरस्कार आपण देशवासियांना समर्पित करतो, असे प्रतिपादन केले.

पंतप्रधान मोदींनी सर्वच देशांनी पर्यावरणाशी मैत्री करीत जगण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी कायदे करुन काही पर्यावरणास घातक गोष्टींवर नियंत्रण आणणे व आपण स्वत: ही आपल्या गरजांमध्ये बदल करुन पर्यावरणाशी संबंधित जीवनप्रणालीचा अंगीकार करणे या मुद्यांवर भर दिला. भारतीय लोकांची जीवनप्रणाली ही मुळातच पर्यावरणप्रेमी असल्याचे सांगत भारतातील शेतक-यांनीही आता रासायनिक कीटकनाशकांऐवजी सेंद्रीय किडनियंत्रणावर भर देण्यास सुरुवात केल्याचे मोदींनी नमूद केले.

महात्मा गांधींच्या कार्याचा उल्लेख
पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कार्याचाही उल्लेख केला. महात्मा गांधींनी केवळ राजकीय कार्यच केले नाही तर पर्यावरणानकुल जीवनपद्धतीवरही भर दिला. त्यांच्या विचारांवर जगाने आचरण केले असते तर सध्या भेडसावणा-या अनेक जागतिक पर्यावरणविषयक समस्यांचा सामना करण्याची वेळ आलीच नसती,असेही त्यांनी सांगितले. पोरबंदरमध्ये जलसंरक्षणासाठी गांधीजींनी केलेल्या कामाचा उल्लेख करीत ते पाहण्यासाठी सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी आवश्य यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणा-या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या