21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय उड्डाणांना ३१ ऑगस्टपर्यंत बंदी

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना ३१ ऑगस्टपर्यंत बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लावली बंदी नागरी उड्डयण संचालनालयाने (डीजीसीए) ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही माहिती शुक्रवारी जारी एका सर्कुलरद्वारे देण्यात आली. पण, ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि विशेषत: डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर लागू होणार नाहीत. डीजीसीएने सांगितल्यानुसार, ३१ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनीटांपर्यंत ही बंदी लागू असतील.

यापूर्वी, डीजीसीएने देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. पण, आता जारी नवीन आदेशानुसार कार्गो विमानांना आणि डीजीसीएने मंजूरी दिलेल्या विशेष विमानांना या यादीतून वगळण्यात आले आहे. भारतात कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.

पण, मे २०२० पासून वंदे भारत अभियान आणि जुलै २०२० पासून ठराविक देशांमध्ये द्वीपक्षीय एअर बबलअंतर्गत विशेष विमानांना उडण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारताचा एअर बबल करार अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूटान आणि फ्रांससह अनेक देशांसोबत आहे. या करारांतर्गत दोन देशांमधील प्रवास करण्यास परवानगी असेल.

बारामूलामध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या